सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
सिंदखेडराजा तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या सरपंच उपसरपंच या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सायाळा येथे सरपंच व उपसरपंच पदी करिता एकही अर्ज न दाखल झाल्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ताई संदीप लंबे यांची अविरोध निवड करण्यात तर उपसरपंच पदी प्रविण शालीकराम सरकटे यांची निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून संदीप भिमराव लंबे मथुरा सुभाष लंबे
दिपक पुरूषोत्तम आव्हाळे गंगुबाई श्रीकिसन जाधव यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच यांची अविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक निवडणूक अधिकारी यांनी या निवडणुकीचे काम पाहिले
सायळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्यामुळे गावकऱ्यांच्या आशा फल्लवित झाल्या आहे नवनिर्वाचित सरपंच रूपाली संदीप लंबे यांनी असे सांगितले की आपण गावाच्या सार्वगिंण विकासाकरिता कटीबद्ध आहे जिल्हाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते व पालकमंत्री नामदार डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या माध्यमातून गाव विकासाला चालना देणार असल्याचे सांगितले
यावेळी सायळा गावातील नागरिकांच्या रूपाली संदीप लंबे व संदीप भिमराव लंबे यांनी आभार मानले आपण टाकलेल्या विश्वासाला कदापिही तडा जावु देणार नाही याची ग्वाही देखील दिली







