सावंगी टेकाळे येथिल सिद्धार्थ गायन पार्टीचा समाजासमोर आदर्श,

 

भिम गित गायनाच्या माध्यमातून गावातील बुद्ध विहारासाठी १ लाख रु चे दिले धम्मदान !
महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील भिम गित गायनाच्या माध्यमातून भजनी मंडळ जोपासतात आंबेडकरी चळवळ

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

* देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा बुलढाणा येथिल सिद्धार्थ गायन पार्टी च्या महिला पुरुषांनी गावातील वाढदिवस , पुण्यानोमोदन व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बौद्ध जयंती व ईतर कार्यक्रम करत धम्म दान जमा केले माञ सदर*
धम्मदानातून भजनी साहित्य घेतले व ऊरलेला पैसा या मंडळाने वाटुन घेतला नाही १० रु ५० असे मिळणारी रक्कम जमा केली व याच पार्श्वभूमीवर गावातील कार्यकर्त्यांने व बौद्ध कर्मचारी अधिकारी यांनी निर्णय घेतला की गावात बुद्ध विहार बांधायचे प्रतेक घरामधुन वर्गणी सुरु याच भजनी मंडळी आपआपल्या घराची सामाजिक वर्गणी दिली माञ धम्म चळवळीला ऊर्जा मिळवुन देणारे क्षेत्र*
म्हणजे बुद्ध विहार आणी याच बुद्ध विहारामधे आपण सामुहिकपणे धम्मदान दिले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेऊन त्यांनी भिम गिताच्या माध्यमातून जमवलेला निधी गावात साकारत असलेले दुमजली बुद्ध विहाराला १ लाख रु चे धम्मदान दिले खरोखर सावंगी टेकाळे येथिल भजनी मंडळाचा आदर्श घेण्यासारखे आहे . महाराष्ट्रात अनेक गायक प्रसिध्द आहेत त्यांचा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर लाखो रु करावे लागतात आणी समाजातील ‘कार्यकर्त्यांना परिश्रम घ्यावे लागतात परंतु डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व बौद्ध जयंती निमित्ताने महिना दोन महिने तारखा बुक असणाऱ्या गायकांना लाजवेल असे काम या सावंगी टेकाळे येथिल गायन पार्टीने केले आहे. महाराष्ट्रातील शेकडो भिम शाहिर गायक कवी यांनी कमावलेला पैसा*
यापैकी काही हिस्सा समाजासाठी खर्च केला काय हे ज्या भागात कवी गायक राहतात तेथील कार्यकर्त्यांना च माहिती असावे परंतु सावंगी टेकाळे येथिल सिद्धार्थ गायन पार्टीने आपला आदर्श महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील भजनी भंजनी मंडळी समोर ऊभा केला आहे याच अनुषंगाने म्हणावेसे वाटते की,*
डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा तुम्हाला जगाला शांती चा संदेश देणारा बौद्ध धम्म दिला आणी त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला संपुर्ण हक्क बहाल केलेत . परंतु डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला धम्म म्हणजे च आंबेडकरी चळवळ महाकवी वामनदाद कर्डक यांनी आयुष्याची शेवट होईपर्यत गायनाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्र पायाखाली घालत गावा गावात गायन केले आणी आंबेडकरी चळवळीला ऊर्जा प्राप्त करुन दिली .याच चळवळीच्या ऊर्जेने गावा गावात कवी गायक तयार झाले आणी प्रतेक गावात याच कवी गायकांनी भजनी मंडळ तयार करुन आंबेडकरी चळवळ जोपासण्याचे काम सुरु झाले तेव्हा पासुन आजपर्यंत प्रतेक गाव खेड्यात भिम गित भजनी मंडळ समाजात जागृती करण्याच काम करत आहेत आणी याच मुळे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली आणी तालुका व जिल्हा पातळीवर चळवळीत काम करणारे नेते पुढे आले* *त्यामुळे या भिम गित गायन पार्ट्या ना जोपासण्याच काम कार्यकर्त्यांने कराव जेणेकरुन त्यांचा होशला वाढुन धम्म चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळीला गती प्राप्त होईल हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते !

Leave a Comment