सावंगी तलाव ते बर्डी रस्ताचे काटेरी झुडूप देत आहे आपघाताला आमंत्रण:

0
353

 

प्रतिनीधी-जालना- तालुक्यांतील सावंगी तलाव ते बर्डी या गावाला जाताना काटेरी झुडुपांनी विळखा घातला आहे.हा रस्ता डांबरीकरण २०१५/२०१६ मध्ये मुख्यंमंत्री ग्रामसडक योजना अंर्तगत रस्ताचे काम झाले असुन,आजपर्यत हा रस्ता साईड पंखे,खडे बुजवने, रस्त्यावर जागो-जागी खड्ड्यामध्ये दुरुस्ती करणे अशा कोणत्याच कामाला अजपर्यत मुहूर्त लागला नाही,सावंगी तलाव ते बर्डी,अंतराला,उमरी तसेच सेलु व पंचक्रोशीतील गावांत जाण्याच्या मुख्य रस्त्यावर काटेरी झुडपांनी अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.तसेच येथील नागरिक जीव धोक्यात घालून व मुठीत धरून प्रवास करीत आहे.सावंगी तलाव ते बर्डी प्रवास करणे हे आपघाताला आमंत्रण देणारे असुन या रस्त्यावर अनेकदा अपघात झाला आहे.या रस्ता करणार्या ठेकेदारावर कार्यवाई करुन,लवकर रस्ता मोकळा करावा अशी मागणी सावंगी तलाव,बर्डी,अंतरवाला,उमरी येथील जनतेकडून व प्रवासी करत आहे.तसेच रसत्यावर असलेल्या काटेरी झुडुपामुळे नरहरी किंगरे यांचा अपघात झाला होता.त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात बचावले व अनेकांना डोळ्याचे आपघात झाले असुन,त्या काटेरी झुडुप संबधीतांनी तोडण्यास सांगावे व रस्ता रहदारीस मोकळा करण्याचा मुहूर्त लवकरात-लवकर काढवा.अशी मागणी येथील गावकरी करत आहे.

प्रतिनिधी:तुकाराम राठोड,जालना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here