गजानन सोनटक्के जळगाव जा
जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे अवकाळी पावसाने फार मोठ्या प्रमाणात गहू व हरभरा पिकाचे नुकसान केले आहे गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने या परिसरात पाण्याची पातळी चांगली आली होती त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणजेच गहू हरभरा मोठ्या प्रमाणात परिसरात पेरणी केली होती व गहू हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणात येईल अशी आशा शेतकर्यांना होती परंतु काढणीस आलेला हरभरा व गहू पीक हे जागेवरच ओले झाले व जोरदार असलेल्या वाऱ्यामुळे गहू पीक हे पूर्णतः पसरलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घासही निसर्गाने हिरावला आहे व शेतकऱ्यांचे या वर्षी प्रत्येक पीक हे पावसाने नुकसान केलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शासन स्तरावरून या पिकाचे पंचनामे व्हावे व शासनाकडून काही मदत मिळावी असे अपेक्षा सूनगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


