Home बुलढाणा सुनगाव परिसरात अवकाळी पावसाने गहू हरभरा पिकाचे अतोनात नुकसान

सुनगाव परिसरात अवकाळी पावसाने गहू हरभरा पिकाचे अतोनात नुकसान

 

गजानन सोनटक्‍के जळगाव जा

जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे अवकाळी पावसाने फार मोठ्या प्रमाणात गहू व हरभरा पिकाचे नुकसान केले आहे गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने या परिसरात पाण्याची पातळी चांगली आली होती त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणजेच गहू हरभरा मोठ्या प्रमाणात परिसरात पेरणी केली होती व गहू हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणात येईल अशी आशा शेतकर्‍यांना होती परंतु काढणीस आलेला हरभरा व गहू पीक हे जागेवरच ओले झाले व जोरदार असलेल्या वाऱ्यामुळे गहू पीक हे पूर्णतः पसरलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घासही निसर्गाने हिरावला आहे व शेतकऱ्यांचे या वर्षी प्रत्येक पीक हे पावसाने नुकसान केलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शासन स्तरावरून या पिकाचे पंचनामे व्हावे व शासनाकडून काही मदत मिळावी असे अपेक्षा सूनगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे