स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश-

 

l

अखेर कृषि व महसुल प्रशानाच्या वतिने मुंग पिकाचे सर्वेक्षण सुरु

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश- डाॕ.ज्ञानेश्वर टाले

सततच्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील जवळजवळ सर्वञ मुंग,उडिद पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले होते
त्याबाबत मेहकर तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी कृषि सहाय्यक यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उडीद मूंग पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी असे निदर्शनास आले होते की पूर्णपणे उडीद मूंग पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आलेले होते. त्या अनुषंगाने कृषी विभागातील कृषी अधिकारी,मंडळ अधिकारी,कृषि सहायक व पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तात्काळ शेतकऱ्याच्या बांधावर येऊन पाहणी करून त्याचे पंचनामे करावे व सदर शेतकऱ्यांच्या अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी शासनास सादर करावा जेणेकरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य शासनाला संबंधित शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी अशी मागणी सुध्दा मा मुंख्यमंञी यांना निवेदनाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी केली होती. सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला होता, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी केलेल्या मागणीला अखेर यश आले व तहसिलदार यांनी तातडीने सदर सर्वेक्षण करुन अहवाल देण्याचे आदेश दिलेत.यावेळी आज प्रत्यक्ष तलाठी आरेगांव येथे शेतक-यांच्या शेतावर भर पाऊसात देखिल सर्वेक्षण करत होते.त्यांच्यासह स्वाभिमानीचे जिल्हाअध्यक्ष डाॕ. ज्ञानेश्वर टाले,शब्बीर खाॕ.पठान,रामेश्वर वायाळ,शेतकरी रवि भोसले,दिनकर वायाळ.उपस्थित होते.

Leave a Comment