हिंगणघाट तालुक्यात नकली विषारी दारू , गांजा जुवा, हुक्का पार्लर या व्यवसायात प्रचंड वाड ?

0
452

 

हिंगणघाट तालुक्यात प्रत्येक प्रभागात चौका- चौकात सेंटर सुरू आहे . यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कोणती कारवाई नाही ? आज अनेक प्रभागातील युवा तरुण नकली विषारी दारू पिल्यामुळे टीबी ,जलपंडू या सारख्या बिमारीने त्रस्त व मरत आहे , कॉलेज शाळेकरी मुले यांच्यामध्ये गांजा , दारू , जुवा ,हुक्का पार्लर याचे व्यसन वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात याच्याशी संबंधित व्यवसाय सुद्धा वाढत आहे . आज प्रशासनाचा कोणताही धाक नाही ,सार्वजनिक ठिकाणी खुलेआम हे व्यसन सुरू आहे नशेमध्ये व्हिडिओ सुद्धा बनवत आहे. आजचा युवा व्यसनाच्या आहारी जात आहे ? हे सर्व शोक पूर्ण करण्याकरिता चोरी ,किडनॅपिंग , ग्रुपने भाईगिरी हे युवा करीत आहे . आज अवैध्य व्यवसाय करणारे( पत्रकार ), लोकप्रतिनिधी , निवडणुकीत अवैद्य धंदे करणारे पक्षाचे फायनान्सर, यांचे व्यवसाय प्रभागात चौका चौकात सुरू आहे हे पक्षाशी जुडुन आहे. कारण जनतेला याच्याशी काही घेणे देणे नाही. जनता विचार केव्हा करेल ? लोकप्रतिनिधी हेच अवैद्य धंद्याचे मास्टर माईंड तर नाही ? प्रभागातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी हे प्रभागात अवैद्य धंद्याच्या विरोधात उठाव का करत नाही ? लोकप्रतिनिधी निवडण्याचे सर्व अधिकार हे प्रभागातील जनतेला दिलेले आहे. (जशी प्रजा तसा राजा )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here