हिंगणघाट शहरातील शुक्रवार बाजार हा रस्त्यालगत मैदानात स्थलांतर करून वट्टे द्या- नगरसेवक सौरभ तिमांडे

0
377

 

नागरिकांना रहदारी करतांना होतो अतोनात त्रास.

भाजीविक्रेत्यान कडून नागरपरिषद द्वारे घेतले जाते कर परंतु सुविधा मात्र शुन्य.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मुख्याधिकारी कडे मागणी.

हिंगणघाट:- २६ मे २०२२
इंदिरागांधी वार्डतील प्रसिद्ध असा शुक्रवार बाजार रस्ता सोडून रस्त्या लगतच्या मैदानात स्थानांतरित करण्याबाबत नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून सविस्तर परिस्तीतीचा आढावा दिला तसेच निवेदन द्वारे मागणी करण्यात आली व त्यांच्या कडक सकारात्मक प्रतिसाद मिळाला.त्यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष युवराज माऊसकर,अक्षय भगत, हर्षल तपासे,ओम सावरकर,रेहान खान,आदर्श त्रिवेदी इत्यादी उपास्तीत होते.
गेल्या कित्येक वर्षापासून इंदिरागांधी वार्ड येथे शुक्रवार बाजार मोठ्या प्रमाणात भरत असते. येथे ताजी भाजी व फळ शेतकरी स्वतः आपल्या शेतातून येथे विक्री करिता घेऊन येतात त्यामुळे संपूर्ण हिंगणघाट शहरातील नागरिक येथे दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदीसाठी येतात तसेच येथे भाजीपाला,फळे, चिकन, मटण, मच्छी, कपडे, जोडे,चप्पल तसेच नासत्याच्या बंड्या असे दुकान सुध्दा मोठ्या प्रमाणात आपल्याला शुक्रवार बाजारामध्ये पाहायला मिळतात. काळा नुसार हा बाजार आणखी प्रसिद्ध होत चालला आणि येथे दुकानांची संख्या वाढत चालल्यामुळे येथील स्थानिक लोक ज्यांचा घरा समोरील रस्त्यावर हा बाजार भरत असतो त्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो कारण बाजारातील दुकानामुळे त्यांना स्वतःच्या घरामध्ये जायला
व घरून बाहेर निघायला अत्यंत त्रास होत असतो.
सुरुवातीला हा बाजार फक्त शुक्रवार बाजार रस्त्यावर भरत होता पण आता हा बाजार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ वर ही भरत असते तसेच राष्ट्रीय महामार्ग पासून सुरु होत डॉक्टर गुजर यांचा जुन्या क्लिनिकच्या रोड पासून संत कबीर वार्ड येथून सुरू होत असून इंदिरागांधी वार्ड पार करून हा बाजार काही दिवसांनी पाण्याची टाकी गोगाजी वार्ड पर्यंत पोहचत आहे.दिवसेन दिवस हा बाजार वाढत चालला आहे. ग्राहकांना त्यांचे वाहन पार्किंगसाठी सुध्दा खूप त्रास होतो ग्राहक आपले वाहन महामार्गावरील उड्डाणपूल तर पार्क करतात आणि रोड वर
बाजार भरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणत ट्रैफिक जाम होतो त्यासाठी दर शुक्रवारी पोलीस स्टेशन द्वारे दोन ट्राफिक पोलीसांची ड्युटी लावावी तसेच बाजार उठल्या नंतर खराब उरलेले चिकन,मटणाचे तुकडे तसेच गळलेला भाजीपाला व फळ यांची घाण रोड वर होते त्याचा देखील स्थानिक नागरिकांना खूप ज्यास्त प्रमाणात त्रास होत आहे छोट्या रोड वर हा बाजार भरत असून बाजारात खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि या बाजारात शहरातील महिला मोठ्या प्रमाणात येतात आणि याच संधीचा फायदा उचलत काही टवाळखोर मुले सुध्दा गर्दीत घुसून महिलांना नको त्या ठिकाणी स्पर्श करतात आणि शहरातील पॅकेटमार देखील याच गर्दीचा फायदा उचलतात.
पट्टीच्या नावावर दुकानदारांकडून ४०-५० रुपये वसुलल्या जाते त्यानुसार त्यांची व्यवस्था काहीच नाही. शुक्रवार बाजाराला लागूनच खुल्या मैदानात आपण या बाजाराला स्थलांतर करून दुकानदारांना स्थायी वट्टे आपण त्यांना दिले तर बरोबर नियोजनानुसार फळ,भाजीपाला तसेच चिकन, मटण,मच्छी आणि कपडे, जोडे-चप्पल तसेच नासत्याची दुकान यांना सगळ्यांना वेगवेगळे विभाग आपण देऊ शकतो तसेच पार्किंगची सुध्दा व्यवस्था आपण याच मैदानात करू शकतो असे केल्यास नागरिकांना त्रास होणार नाही.या गंभीर समस्येचा लावकार्यत लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी नगरसेवक सौरभ तिमांडे यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here