होन्डाई शोरुम येथे जबरीने लुटमार करणारे आरोपीतांना जिल्हा बुलढाणा, वर्धा येथून अटक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांची कार्यवाही

0
69

 

प्रमोद जुमडे, वर्धा

दिनांक 12/06/2023 रोजी रात्री फिर्यादी नामे- श्री. देविदास अजाबराव टोनपे, वय 58 वर्ष, रा. आदर्श कॉलनी, साटोडा, वर्धा हे होन्डाई शोरुम बायपासरोड, वर्धा येथे सेक्युरीटीगार्ड म्हणुन नाईट ड्युटीवर असतांना अज्ञात तिन आरोपीतांनी संगनमत करुन फिर्यादीचे ताब्यातील होन्डाई शोरुम मध्ये प्रवेश करुन 1 ) रेनॉल्ड कंम्पनीची डस्टर कार क्रमांक एमएच 49 बी 8200

किंमत2,60,000/- रु. 2 ) वेगवेगळया कंम्पनीचे कारच्या तिन चाव्या किंमत 7,000/- रु. 3) एक मोटोरोला कम्पनीचा मोबाईल किंमत 3,000/- रु असा एकुण जु. किंमत 2,70,000/- रु चा जबरदस्तीने हिस्कावुन जिवे मारण्याची धमकी देवुन चोरी करुन नेला अशा फिर्यादीच तॉडी रिपोर्टवरुन सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे समांतर तपास करुन गुन्हयाचे घटनास्थळावरील सिसिटीव्ही फुटेजचे आधारे गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न करुन सदर आरोपीतांचा तांत्रीक माहीतीचे आधारे शोध घेवून आरोपी नामे- 1) विश्वजित विठ्ठलसिंग सिसादे, वय 23 वर्ष, रा. बोरजवाळता. खामगाव जिल्हा बुलढाणा यास खामगाव जिल्हा बुलढाणा येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास सखोल विचारपुस केली असता

त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार आरोपी नामे- 2) इमदात उर्फ मोनूतलीम खान पठाण, वय 23 वर्ष, रा. जुनीवस्ती म्हसाळा सेवाग्राम, वर्धा, 3) शेख अयानतर्फे राजा शेख जमालुद्दीन, वय 19 वर्ष, रा. नविन वस्ती कारला लॉनजवळ म्हसाळा, वर्धा, 4) मंगेश ठाकरे, रा. मंगरुळ (दस्तगीर), जिल्हा अमरावती यांचे सह मिळुन केल्याचे सांगीतल्याने आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना ताब्यात घेवुन

आरोपीतांच ‘ताब्यातुन गुन्हयातील चोरीस गेलेली 1) रेनॉल्ड कंम्पनीची डस्टर कार क्रमांक एमएच 49 बी 8200 किंमत 2,60,000/-रु. 2) एक होन्डाई कम्पनीचे कारची चाबी किंमत 3,000 /- रु. 3) गुन्हयात वापरलेल आरोपीतांचे तिन अॅन्ड्राईड मोबाईल किंमत 30,000 /- रु असा एकूण जु. किंमत 2,93,000/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करुन नमुद आरोपीतांना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकिस आनला.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा आबुराव सोनवाने, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, प्रमोद पिसे, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, नितीन ईटकरे प्रदिपवाद दिनेश बोक अनुप कावळे सर्वनेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सेवाग्राम चंद्रशेखर चकाटे यांचे मार्गदर्शनात पोउपनी संतोष चव्हाण पोलीस स्टेशन सेवाग्राम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here