(सूर्या मराठी न्युज ब्युरो)
कापसाने भरलेले टाटा 407 वाहन उलटून एक ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास संग्रामपूर ते जळगाव जामोद रस्त्यावर घडली .
संग्रामपूर जवळील शिवनेरी ढाब्याजवळ हे वाहन पलटी झाले यात एक मजूर वाहनाखाली दबला गेल्याने गंभीर जखमी झाला . त्याला काही युवकांनी बाहेर काढून मोटरसायकलीवर उपचाराकरिता नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे . मृतकाचे नाव अक्षय नवलसिंग रघुवंशी वय 22 , रा . जळगाव जामोद असे आहे . त्याच्यासोबतचे चार मजूर जखमी झाले आहेत . घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तामगावचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत विखे , बिट जमादार माळी , बोंबटकार , कायंदे हे होमगार्डसह दाखल झाले . घटनास्थळावरच वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले . याबाबतची तक्रार मृतकाचे वडील नवलसिंग रघुवंशी यांनी तामगाव पोलिसांना दिल्यावरून चालक धम्मपाल जानराव वानखडे रा . सावरगाव ता . जळगाव जामोद याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला .