Home Breaking News भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

312
0

 

 

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

भूमिपुत्र च्या लढ्याला यश
अखेर झाले पंचनामे सुरू
अतिवृष्टीने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांचे उडीद मुंगांचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत . भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी निवेदने देण्यात आले होते याच निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री उधव ठाकरे साहेब यांनी अतिवृष्टीने खराब झालेल्या उडीद व मुंगांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत .
भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णुपंत भुतेकर साहेब यांनी दिनांक २० आगस्ट २०२० रोजी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (महाराष्ट्र राज्य ) मा. बाळासाहेब थोरात ( महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य ) मा. दादासाहेब भुसे ( कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांना निवेदन दिले होते तर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष राम पाटील बोरकर यांनी दिनांक २४ आगस्ट २०२० रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब वाशिम , मा. जिल्हा कृषिअधिकारी साहेब वाशिम यांना निवेदन दिले होते . तसेच यवतमाळ, हिंगोली , परभणी , येथे सुद्धा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी निवेदन दिले होते.
खरिपातील बोगस बियाणे उत्पादक कम्पन्यां यांच्या गोरख धंद्यांमुळे विदर्भ मराठवाद्यातील २५ % शेतकरी दुबार तिबार पेरणी करूनही उत्पादना पासून वंचित राहिला आहे कसे बसे हाता तोंडाशी आलेले उडीद व मुंगांचे पीक आगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीने उध्वस्त करून टाकले याच पार्श्वभूमीवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेने च नाही तर संस्थापक अध्यक्ष साहेबानी सुद्धा हवालदिल झालेल्या शेतर्यांची व्यथा शासनासमोर मांडली या सर्व निवेदनाची दखल घेत मा. मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे

Previous article८ वर्षीय नाबालिकवर अत्याचार ,नराधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल…….
Next articleसंग्रामपूर शहरात बँक ऑफ महाराष्ट्र मधील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह बँक ऑफ महाराष्ट्र शाखा संग्रामपूर राहील दोन दिवसाकरीता बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here