Hingnghatnews /हिंगणघाटात जीव धोक्यात; रेल्वे गेट बंद, अंडरपासची मागणी तीव्र — आंदोलनाचा इशारा

0
1

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील प्रभाग क्रमांक १९ परिसरात रेल्वे गेट बंद झाल्यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला असून, सुरक्षित अंडरपास किंवा पर्यायी मार्गाची मागणी आता तीव्र झाली आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.wardhanews

सुमारे १६-१७ वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले रेल्वे गेट फ्लायओव्हरच्या बांधकामानंतर बंद करण्यात आले. मात्र, त्या बदल्यात कोणतीही सुरक्षित व्यवस्था न केल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

परिसरात शाळा, रुग्णालय आणि एपीएमसी मार्केट असल्यामुळे विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि व्यापाऱ्यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.

विशेषतः वृद्ध नागरिकांना फ्लायओव्हरवर चढणे-उतरणे अत्यंत कठीण जात असून, त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ जवळ असल्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढतो आणि परिस्थिती अधिक धोकादायक बनते.

या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रेल्वे गेट पुन्हा सुरू करावे किंवा सुरक्षित अंडरपास उभारावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.ajitpawar

Hingnghatnews /सदर निवेदन युवक विधानसभा अध्यक्ष अविनाश नवरखेले (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) यांनी विविध शासकीय स्तरांवर सादर केले असून, आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here