8 लाख 17 हजाराची घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी मध्य प्रदेशातील लोधीखेडा इथून अटक

0
413

 

सचिन वाघे वर्धा

दि.२१ मार्च
स्थानिक संत चोखोबा वार्डातील हॉटेल व्यावसायिक जितेंद्र राऊत हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी १४ मार्चला रात्रीच्या सुमारास एकूण ८ लाख १७ हजार रुपयाची घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी संत चोखोबा वार्ड येथीलच एका आरोपीस अटक केल्यानंतर आता पोलिसांनी काल पोलिसांनी पुन्हा एक आरोपी रोशन डोंगरे मु.लोधिखेडा यास अटक केली. आज स्थानिक न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठड़ी मंजुर केली.
घटनेच्या दुसरे दिवशीच स्थानिक आरोपी सोनु सिंग उर्फ सौनिहालसिंग याचेकडून २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या घरफोड़ीप्रकरणी एकूण तीन व्यक्ति सहभागी असून इतर दोन चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी दुसरा आरोपी रोशन डोंगरे याला मध्यप्रदेशातील लोधिखेडा (ता.सौंसर) येथून अटक केली. सदर आरोपीकडून घटनेदरम्यान वापरलेली दुचाकी, मोबाईल तसेच ३२८० रुपये नगदी असा ४४२८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
या चोरीच्या घटनेतील तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहे.या प्रकरणाचा पुढिल तपास ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोहवा विवेक बंसोड़, शेखर डोंगरे पोशी सुहास चांदोरे,सहायक उपनिरीक्षक सादिक शेख हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here