तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युवगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली
यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील परसाडे गावात एका प्रेमी युवगलांनी प्रेमसंबधातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन , या घटनेमुळे गावात एकच शोककळा पसरली आहे . याबाबत मिळालेली माहीती अशी की , परसाडे गावात एकाच समाजातील प्रेमींनी गाव शिवाराला लागुन वड्री परसाडे गावाला जाणाऱ्या असलेल्या पुष्पा गडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडास दोघांनी एकाच वेळी गळ्फास घेवुन आपले जिवन संपवल्याची दुख :दायी घटना घडली आहे .विशेष म्हणजे आज यातील तरुणाचा चिनावल येथे साखरपुडा असल्याचे वृत मिळाले असुन , मात्र या तरुणाचे परसाडे येथील मिना शावखाँ तडवी वय २२ वर्ष राहणार परसाडे व हरीपुरा येथील शाहरूख बाबु तडवी वय१९ या दोघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आला आहे . या बाबत वड्रीचे पोलीस पाटील ईब्राहीम तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात गुन्हा दाखल कसण्यात आला असुन , पोलीसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदना साठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले आहे ?