कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगतात त्याच्या मुलाने केली डॉक्टरास मारहाण

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट – दि.13
नागपुर येथून उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तिचा मृत्यु झाल्याचे सांगताच त्याचे मुलाने एका खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरास मारहाण केल्याची घटना आज दि.13 रोजी सायंकाळी घडली.
शहरातील शिवाजी वार्ड येथे डॉ.निर्मेश कोठारी यांचे हॉस्पीटल आहे.
आज दि. 13/04/2021रोजी हॉस्पीटलमध्ये पेशंटची तपासणी करीत असतांना एका कोविड पॉसिटीव रुग्णास सायंकाळी
5.45 वाजताचे दरम्यान ऑटोमध्ये आणण्यात आले. रुग्ण अत्यवस्त स्थितीत असल्याचे सांगण्यात आल्याने आल्याची माहीती मिळाल्याने डॉक्टर कोठारी स्वत: रुग्णाजवळ गेले. डॉक्टरांनी पाहणी केली असता सदर रुग्ण मृत अवस्थेत होता. मृत घोषीत रोडवर का करावे म्हणुन रुग्णास हाँस्पीटलच्या पोर्च मध्ये घेतले.यावेळी मृतक सोबत मुलगा सलमान खान
सत्तार खाँन व इतर दोन-चार नातेवाईक होते.यावेळी नागपुरला केलेल्या उपचाराचे कागदपत्रे दाखविले असता रुग्ण कोरोना पाँझीटीव्ह असल्याचे दिसुन आले. म्हणुन डॉ.कोठारी यांनी मृतकाचा मुलगा सलमान खाँन सत्तार खाँन व नातेवाईकांना मृतक कोरोना पॉझीटीव्ह असून मृत पावला असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या मृतकाचे मुलगा सलमानखान सत्तार खान याने डॉक्टरांना अंगावर धावून जात मारहाण केली.
यावेळी डॉक्टर कोठारी यांनी भ्रमणध्वनीवरुन पोलिसांना पाचारण केले,यामुळे पुढील अनर्थ टळला.
डॉ.निर्मेश कोठारी हे आयएमएच्या सदस्यांसह स्थानिक पोलिस ठाण्यात पोचले.
आयएमए सदस्यांनी आरोपीवर योग्य कारवाई न झाल्यास शहरातील खाजगी बाहयरुग्णसेवा बंद करण्याची धमकी पोलिस प्रशासनाला दिली.
पोलिसांनी आरोपीवरती विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment