Home बुलढाणा श्याम देशपांडे माझे दैवत.. चंद्रशेखर शुक्ल…..

श्याम देशपांडे माझे दैवत.. चंद्रशेखर शुक्ल…..

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

……. साखरखेर्डा येथे एस ई एस हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज मध्ये श्याम काका देशपांडे यांची जयंती २० एप्रिल रोजी पार पडली .ते जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते. त्यांनी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटी कशी वाढेल याकडे लक्ष देऊन खरोखर पणे एस .इ. एस हायस्कूल ज्युनिअर कॉलेज हे भलेमोठे विस्तारमय केले. आज परिसरामध्ये भरपूर विद्यार्थी संख्या वर्ग 5 ते 12 पर्यंत असलेली साखरखेडा एज्युकेशन सोसायटी श्यामकाका देशपांडे यांनी नावारूपास आणली .कोणत्याही प्रकारची अडचण साखरखेडा एज्युकेशन सोसायटी मध्ये येऊ नये यासाठी सदैव तत्पर राहिले. श्यामकाका देशपांडे यांनी शेवटच्या क्षणी चंद्रशेखर शुकलं यांना सचिव पद देण्याचे ठरवले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नवनियुक्त सचिव चंद्रशेखर शुकलं शाळेचे मुख्याध्यापक एस .टी दसरे, पर्यवेक्षक एम. बी .भगत, प्रा. रवींद्र माठे, माजी उपसरपंच दर्शनकुमार गवई, विलास ठाकूर (हरित सेना संयोजक) ,मगन रबडे हजर होते !ज्यावेळी कोरोणा चे सर्व नियम पाळण्यात आले ।1