Home Breaking News लॉक डाऊन मुळे व्यवसायात नुकसान गळफास घेऊन आत्महत्या

लॉक डाऊन मुळे व्यवसायात नुकसान गळफास घेऊन आत्महत्या

529

 

सचिन वाघे वर्धा
2.5.21
हिंगणघाट
स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अरविंद पुंडलीकराव चंदनखेडे (४५) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजता उघड़कीस आली.
मृतक अरविंद चंदनखेडे हे कंत्राटदार असून संचारबन्दी दरम्यान त्यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला,याचे निराशेपोटी त्यांनी इहलोक सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
मृतक अरविंद हे संत तुकडोजी वार्ड परिसरातील प्रज्ञानगर भागात रहात असून त्यांचेमागे पत्नी,तीन भाऊ,बहिण,२ मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
शहरातील शासकीय कंत्राटदार अशोक चन्दनखेड़े यांचे ते छोटे बंधु होते.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोहवा वीरेंद्र कांबळे,बंडू महाकाळकर करीत आहे.