यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे
मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करुण प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.हसिना सिराज तडवी ,व विस्ताराधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, वाघिरा शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी सर ग्रामपंचायत शिपाई कुरबान तडवी,ग्रामरोजगार सेवक मेहेरबान तडवी यांचेसह ग्रामस्थ मुकेश पाटील सचिन पाटील तेजस चौधरी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते







