Home वर्धा नगरसेवकाचे दुर्लक्ष वॉर्डातील रहिवासी यांचे नगराध्यक्षास वार्डातील समस्या बद्दल निवेदन !

नगरसेवकाचे दुर्लक्ष वॉर्डातील रहिवासी यांचे नगराध्यक्षास वार्डातील समस्या बद्दल निवेदन !

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.1.7.21  शास्त्री वार्ड व डॉ. मुजुमदार वार्ड येथील स्थानिक रहिवासी यांना गीमाटेक्स कंपनी च्या बाजूला असलेल्या रोडवर गड्डे पडल्याल्यामुळे पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कधी पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोडची दुरुस्ती करण्यात यावी , रोडला लागूनच मोठा नाला असल्यामुळे जाण्या येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जाणे-येणे करावे लागते तसेच या नाल्याची साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात मच्छराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्यामुळे फवारणी करण्यात यावी संबंधित निवेदन नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना देताना वार्डातील अश्विन ढाले, संदीप ठमके, रवी अवघडे, गजानन वाकडे, नरेश रामटेके , संजय सरपाते , विनोद नारनवरे, सचिन कापसे, बबलू शेख, ताराचंद देव्हारे व इतर नागरिक उपस्थित होते