Home Breaking News वैजापुर तालुक्यातील खंबाळा फाटा येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

वैजापुर तालुक्यातील खंबाळा फाटा येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

0
1945

 

ता. प्रतिनिधी, वैजापूर(जि. औरंगाबाद)

वैजापूर तालुक्यातील खंबाळा फाटा येथे एका शेतवस्तीवर अज्ञात चोरांनी एका कुटुंबाला जबर मारहाणीत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री १वाजेच्या सुमारास घडली. खंबाळा शिवारातील शेतवस्ती गट नं १०१ मध्ये राहणारे जिजाराम राधाजी गोरसे वय ५० (रा.लांडे वस्ती,खंबाळा) हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी व कुटुंबातील लोकांनी जेवण केले व घरातील एक खोलीत जिजाराम, त्यांची पत्नी लहान मुलगी तर दुसऱ्या एका खोलीत मुलगा राजेंद्र व सून मोनिका हे झोपी गेले .गुरुवारी रात्री १च्या सुमारास घराच्या पाठीमागच्या बाजूचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी राजेंद्र याच्या खोलीत प्रवेश केला. राजेंद्र व मोनिका या दोघांना लाकडी दांड्याने जबर मारहाण केली .मारहाणीत राजेंद्र जिजाराम गोरसे वय २४ याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला,तर मोनिका हिच्या डोक्याला,गळ्याला मारून गंभीर जखमी केले मोनिका हि गंभीर जखमी असल्याने हिस रात्री शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.राजेंद्र याचा सहा महिन्यापूर्वीच मोनिका हिच्याशी विवाह झाला होता. शिवाय राजेंद्र हा घरात एकुलता एक मुलगा होता.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक सम्राट राजपूत, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव आदींनी घटनास्थळी पाहणी करून तपासाची चक्रे गतिमान फिरण्याच्या सूचना केल्या याबाबत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here