Home Breaking News पक्षांचा अधिवास नष्ट केल्या प्रकरणी निसर्ग साथी चे एक दिवसीय धरणे आंदोलन

पक्षांचा अधिवास नष्ट केल्या प्रकरणी निसर्ग साथी चे एक दिवसीय धरणे आंदोलन

 

हिंगणघाट शहरातील पंचायत समिती परिसरातील कवठ वृक्ष जुलै अखेरीस पावसाने कोसळल्याने झाडांवरील पक्षांचा अधिवास सुरक्षीत ठेवून पक्षांचा प्रजनन संपेपर्यंत आक्टोबर पर्यत कवठ वृक्ष जैसे थे ठेवण्याचे आश्र्वासन प्रशासनाने निसर्ग साथी फाऊंडेशन ला दिले होते.हिंगणघाट शहरात गत 10 वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्गातील पशु पक्षी संवर्धनासाठी निसर्ग साथी फाऊंडेशन कार्यरत आहे.
मात्र गत 4 – 5 दिवसांपूर्वी प्रशासनाने दिलेला शब्द फिरवुन झाडाच्या फांद्या कटर नी कापल्या तद्दतच वृक्षाखाली विस्तव पेटवल्याने वृक्षांवर निवासी पक्षांची पिले मृत्यू मुखी पडली तर काही घरटी उद्धवस्थ झाली.प्रशासनाने दिलेला शब्द फिरविल्याचे निषेधार्थ तथा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास्तव निसर्ग साथी फाऊंडेशन नी पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवशीय धरणे आंदोलन केले .या धरणे आंदोलनात निसर्ग साथी फाऊंडेशन चे अध्यक्ष प्रविण कडु, रुपेश लाजुरकर, गजू कुबडे, प्रभाकर कोळसे, गुणवंत ठाकरे, राकेश झाडे,विजयभाऊ थोरात ,साई खोब्रागडे , प्रविन कारळकर , परिक्षित ढगे ,दिनेश मुडे आदी निसर्ग साथी सहभागी झाले होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा