अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक
चामोर्शी: दिनांक २८,शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणी हे मोबाईलवरील ॲप विकसित केले आहे. शेतकर्यांच्या सातबारावर त्यांनी पेरलेल्या पिकांची नोंद असणे आवश्यक असते. शेतक-यांच्या सातबारावर पिकांची नोंद घेण्यास होणारा विलंब किंवा चुकीच्या पिकाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यास हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून
केवळ रामजी हरडे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साक्षी वांढरे,लोचना कोटांगले व पायल मुनगेलवार यांनी नाचणगाव (देवळी) येथील शेतकरी रामदास बारसागडे, जीवनदास सोनटक्के, मनोज बारसागडे, धनराज लटारे, मुखरू येग्गावार, मनोहर कोहळे व एकनाथ कोठारे इत्यादी. शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अँप वर पिक पेरा कसा भरायचा व ई-पीक पाहणी चे फायदे समजावून दिले. एका मोबाईल वरून २० शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेता येते. पीक पाहणी अँप शेतकऱ्यांना उपयोगात आणण्यासाठी अतिशय सोपे आहे. शेतकरी कधीही त्यांच्या खरीप व रब्बी पिकांची नोंद ठेवू शकतो.







