स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वन अधिकारी कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
डोणगांव येथे वननाक्यावर गेल्या तीन दिवसापासून एका माकडाला शेतामध्ये विद्युत शॉक लागल्यामुळे गंभीर दुखापत झाली होती त्या माकडावर सुनील पाटील आखाडे यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर बोलून उपचार केले होते. माञ त्यानंतर सदर माकड हे वन विभागाच्या त्याच्या मागील वन नाक्याच्या बाजुला तीन दिवसापासून गंभीर होते. सदर माकड काही खात पीत नव्हते अशा परिस्थितीमध्ये परिसरातील नागरिकांनी स्वाभिमानी चे युवा नेते देवेंद्र आखाडे यांना कळवले की सदर माकड विद्युत शॉक लागून आजारी असून काही खात पित नाही व त्याच्यावर उपचार करणे आवश्यक आहे.त्यांनी लगेच ही घटना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना सांगितले त्यांनी लगेच तातडीने स्वाभिमानीचे पदाधिकारी सह दाखल होत रेस्कू टीमचे प्रमुख बुलढाणा राहुल चव्हाण यांना माहिती दिली तसेच रेंजर घाटबोरी तोंडीलायता व संबंधित विभागाचे कर्मचाऱ्यांना तातडीने सदर माकडावर उपचार करावे लागणार असून गेल्या तीन दिवसापासून वन विभागाच्या नाक्याजवळ असताना देखील वन मजूर व संबंधित बीटचे कर्मचारी यांनी दुर्लक्ष केले ही बाब संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होती मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी यामध्ये हलगर्जी करत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह दिनांक 16. 10. 2021 रोजी सकाळी अकरा वाजता डोणगाव वन नाक्यावर दाखल होऊन श्री आंबोरे यांच्या घरावर सदर माकड गच्चीवर बसलेले असताना श्री जाधव वनमजुर राठोड भालेराव मॅडम यांनी सदर माकडाला पकडून नाक्यावर आणले त्यानंतर सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांना बोलावून त्या जखमी माकडावर उपचार करण्यात आले. सदर माकड पुढील उपचारासाठी वन विभागाच्या स्वाधीन करुन अकोला येथे पाठविण्यात येणार असल्याचे अधिकारी यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी अमोल धोटे पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन अग्रवाल देवेंद्र आखाडे, तालुका उपाध्यक्ष गणेश जुनघरे हबीब भाई गौतम सदावर्ते सर विवेक ठाकरे युसुफ खा पठाण,आकाश जावळे,सद्दाम शहा,किशोर खोडके.षसह गावकरी उपस्थित होते






