Home Breaking News सेलु रोडवर असलेले गिट्टी क्रेशर मधून चालणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था

सेलु रोडवर असलेले गिट्टी क्रेशर मधून चालणाऱ्या वाहनांमुळे रस्त्याची दुरवस्था

0
277

 

वर्धा:- हिंगणघाट तालुक्यातील सावली वाघ येथे असलेले गिट्टी क्रेशर मुळे गावातील लोक त्रस्त झाले आहे गिट्टी क्रेशर मधून चालणाऱ्या जड वाहनांमुळे सावली वाघ येथील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे
अनेकवेळा जिल्हाधिकरी, तहसीलदार व लोकप्रतिनिधीकडे निवेदनाच्या माध्यमातून रस्त्याची दुरुस्ती व जड वाहनाची बंदी करण्याबाबत मागणी केली. परंतु, त्याचा कुठलाच फायदा झाला नसल्याने, दिवसेंनदिवस या गिट्टी खदान मधून चालणाऱ्या जड वाहनांमुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कधीही मोठा अपघात होणाची शक्यता नाकारता येत नाही. गावाला लागुन असलेल्या खदानमधून मुरूम, गिट्टीची क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात नियमित वाहतूक होत आहे. तसेच खदानी मधून गौणखनिज उत्खनन होते.
त्याशिवाय स्टोन क्रेशर, डांबर प्लांट आहेत. त्यामुळे जड वाहनाची ये-जा चालू राहते म्हणून रस्त्यावर मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणे कठीण झाले आहे. रसत्याने अनेक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलेला आहे सावली सेलू पोथरा परिसरातील गावामधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी मार्ग सावली हिंगणघाट ला जातात आणि त्याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत असल्याने अनेकवेळा छोट्या मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या गिट्टीखदान मधून चालणाऱ्या जड वाहनांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आजूबाजू गावातील नागरिक व विद्यार्थी करीत आहे
जोपर्यंत काही मोठा अपघात होत नाही तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार नाहीत का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here