डाॅ स्वागत तोडकर यांनी घेतले श्रींचे समाधी दर्शन शेगाव संस्थान चे कार्य प्रेरणादायी- डाॅ स्वागत तोडकर

0
987

 

शेगाव : आरोग्य गुरू डाॅ स्वागत तोडकर यांनी संतनगरीत श्री गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीं चे समाधी दर्शन घेतले. श्री गजानन महाराज संस्थान मधील शिस्त,सेवा भाव,महाप्रसाद व्यवस्था,दर्शनबारी तसेच
कोरोना चे पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर,सॅनिटायझर, ई पास तपासणी, या बाबीची माहीती जाणून घेतली.कोरोना चे पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज संस्थान चे नियोजनाची डाॅ स्वागत तोडकर यांनी प्रशंसा केली.व शेगाव देवस्थान शिस्तप्रिय असून प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांचे सोबत खामगाव येथील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा काॅग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चौव्हाण ,सौ राजकुमारी चौव्हाण उपस्थित होते. संस्थान चे शिस्तीनुसार ई पास काढून रांगेत दर्शन व महाप्रसाद लाभही घेतला.
दरम्यान शेगावात आगमनप्रसंगी
प्रेस क्लब शेगाव चे अध्यक्ष अनिल उंबरकार, उपाध्यक्ष नंदु कुळकर्णी यांनी डाॅ स्वागत तोडकर यांचा यथोचित सत्कार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here