श्रीक्षेत्र शेंगाव ते पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास सर्वपक्षाच्या वतीने तिव्र आंदोलनाचा इशारा :- विजय पवार

0
352

 

 

प्रतिनिधी सतीश मुलंगे

जागतीक किर्तीच्या लोणार सरोवर येथुन सुरू झालेल्या पंढरपुर ते शेंगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असुन संबधीत ठेकेदार व
एम एस आर डी सीचे अधीकारी यांनी संगनमत करून शहरातील ड्रीव्हाडर, नाल्या, स्ट्रीट लाईट, तसेच शेतरस्ते केलेले नाही याबाबत आता मेहकर, लोणार, जानेफळ
,सुलतानपुर येथील सर्व पक्षीय नेत्यानी तसेच नागरिकानी या बाबत गावागावात बैठकी घेउन आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे याबाबत नुकतीच लोणार व मेहकर
मतदार संघातील सर्वपक्षीय नेते व नागरिकाची लोणार येथील राममंदीर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याची प्रतिक्रीया
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपा पदाधिकारी विजय पवार यांनी दिल्या
Vo:-
श्रीक्षेत्र शेंगाव ते पंढरपुर हा राष्ट्रीय महामार्ग चांगल्या दर्जाचा व्हावा याप्रमुख उददेशाने केंद्रीय मंत्री व विकासाचे महामेरू म्हणुन ओळख असणारे
नितीनजी गडकरी यांनी हया रस्तासाठी करोडो रूपये दिले पंरतु लोणार पासुन ते जानेफळ पर्यत हया रस्त्याचे काम अत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असुन यामध्ये
लाखो रूपयाचा अपहार संबधीत ठेकेदार व एम एस आर डी सी चे अधिकारी यांनी केल्याचे उघड झाले कारण पंढरपुर पासुन ते लोणार तालुक्याच्या सिमेपर्यत हा
महामार्ग 80 फुटाचा आहे तर लोणार ते जानेफळ पर्यत हयाच महामार्गाचे काम 60 फुटाच्या आत करण्यात आले आहे एवढेच नव्हे तर शहरामध्ये हा रस्ता जानुन
बुजन कमी करण्यात आला आहे लोणार शहर हे जागतीक र्कितीचे असल्याने या शहरात रस्ता हा दुर्तेफा असणे गरजेचे आहे असे असताना सुध्दा रस्ता हा अरूंद व
व्डीव्हाडर न टाकता बनविण्यात आला आहे हा रस्ता बांधकाम होउन अवघे काही दिवसच झाले असे असताना सुध्दा रस्त्याला तडे गेले नाल्याचे काम सुध्दा निकृष्ट
दर्जाचे झाले आहे याबाबत नागरिक आता दक्ष झाले असुन या विरूद जनआंदोलनाच्या पवित्रा घेत आहे. या बाबत दि 19 डिसेबर रोजी राममंदीर येथे बैठक झाली
असुन या बैठकीसाठी मेहकर येथील या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय पवार हे उपस्थीत होते तर लोणार येथे सर्वप्रथम या आंदोलनाची सुरूवात करणारे
राष्ट्रवादीचे दहीफळे , कॉग्रसेचे प्रदीप संचेती, तौफीक कुरेशी, निर्मल संचेती, मारोतराव सुरूशे, ॲङ गजानन ठाकरे ,सिध्दार्थ अंभोरे, पत्रकार अविनाशजी शुक्ल, सुंदर
संचेती, पत्रकार सतिश मुलगे, सह आदी मान्यवर उपस्थीत होते.
गाव मज़ान्युज साठी प्रतिनिधी सतीश मुलंगेलोणार बुलडाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here