Home Breaking News घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत गाडगे बाबा यांच्या...

घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

 

थोर समाज सुधारक गाडगे बाबांचे विचार अमलात आणल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही – किरणताई बोढे

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

सोमवार 20 डिसेंबर रोजी घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे म्हणाल्या संत गाडगे बाबा महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक होते. कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या एका हातात खराटा व दुसऱ्या हातात मडके होते त्याने ते गावात स्वच्छता करायचे सामाजिक न्याय देण्यासाठी व स्वच्छता करण्यासाठी ते गावोगावी भटकत असत. समाज सुधारणा व स्वच्छता करण्यात त्यांना जास्त रुची होती. प्राण्यांची हत्या करू नका समाजात अस्पृश्यता पाळू नका असा संदेश ते देत असत संत गाडगे बाबा दिन दुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे कर्मयोगी होते. बाबांचे विचार अमलात आणल्याशिवाय समाज प्रगती करू शकणार नाही.
उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा सौ. किरणताई विवेक बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्य पूजा दुर्गम, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, ज्योत्सना मडावी, किरण केळझरकर, संजना पाटील, मोनिका यादव, सीता कोलीयन, रश्मी यादव, सुनीता सातघरे, शोभा कैथल, शारदा राखुंडे, बीबी चिंचोलकर, वर्षा धोतरे, संगीता राखुंडे, सिंधू कामतवार, कल्पना निवलकर, साहीन शेख, सुनंदा लिहीतकर, शीतल कामतवार, पायल मांदाडे, भरती पर्ते, खुशबू मेश्राम उपस्थित होते.