शेगाव, ता.३१ आठवडी बाजार दुकानासमोरील उघड्यावर करणाऱ्या अतिक्रमण धारकांवर करवाई करा अशी मागणी
आठवडी बाजार येथील आ.क्र. ३५ मधील सर्व १९ दुकानदार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. पालिकेने करवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. निवेदनात नमूद आहे की दिलेल्या दि. ११/०४/२०१८ च्या नोटीस नूसार आम्ही आ.क्र.३५ मधील दुकानांचा आगाऊ ताबा चाबी देवून घेतला आहे. सदर दुकानांचा ताबा घेतल्यावर जेव्हा आम्ही तिथे नविन व्यवसायास प्रारंभ करण्यास गेलो तेव्हा दुकानांसमोर खुल्यावर मास विक्रीची अंदाजे ३० ते ४० दुकाने आहेत.मास विक्री ही अवैध व उघड्यावर होत आहे. दुकानांसमोरील मांस विक्रीची दुकाने हटवावी दुकानांमध्ये येणाऱ्या दुर्गंधीमुळे कोणीही ग्राहक फिरकत नाही व आम्ही पण आमच्या दुकानात बसु शकत नाही.याबाबत पालिकेने २५ फेब्रुवरी २०२१ रोजी सर्वानुमते आरोग्याच्या तसेच कायदा व सुव्यवथेच्या प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टिने शहरातील मलनिस्सारण केंद्राच्या बाजूला खुल्या जागेत मटण विक्रेत्यांची व्यवस्था करण्यांत यावी. याबाबत येणा-या खर्चात ही सभा आर्थिक व प्रशासकीय मान्यता प्रदान करीत आहे. पुढील नियमानुसार कार्यवाही मुख्याधिकारी यांनी करावी. असा ठराव सुद्धा पारित केला होता.पण त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अवैध मांस विक्रीमुळे आमच्या दुकानदाऱ्या ठप्प झाल्या आहेत. उघड्यावर असलेली मास विक्रीची अवैध दुकाने ही कायमस्वरुपी बंद करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.निवेदनावर मोहन नावकार,संजय नावकार, संजय राजुस्कर,फिरोज सैफुद्दीन बुरहाणी,राजेश गणेश,दिलीप निकुळे,असमोल हक्क, मुरलीधर काळे,विजय कराळे,संतोष खंडारे,राजेंद्र तायडे,अनुराधा पाटील,संजय धनोकार,रत्नप्रभाबाई मसने, उज्वला मसने,जिजाबाई दिंडोकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.







