साकळी येथे आदिवासी अविवाहीत युवकाची घरात गळफास घेऊन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0
864

 

यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील ‘साकळी’ येथे २१ वर्षीय आदीवासी अविवाहीत युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याविषयी यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, ” मोहमंद इसा तडवी रा.साकळी, ता.यावल जि.जळगाव या २१ वर्षीय युवकाने आज गुरुवार, दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ‘साकळी’ येथील आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यावेळी वडील इसा तडवी हे मजुरीसाठी कामानिमित्त शेतात गेले होते. ते घरी आल्यावर त्यांना मोहमंद इसा तडवी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस स्टेशनचे सफौ युनस तडवी यांनी घटनेचा पंचनामा केला. या युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणी मयताचे वडील ईसा अन्वर तडवी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करत आहेत. यावलच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here