Home Breaking News निशांत दिवाळी अंकास राज्यस्तरीय मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार प्रदान

निशांत दिवाळी अंकास राज्यस्तरीय मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कार प्रदान

0
293

 

 

मराठी भाषा कशी जगेल याची चिंता हवी – डॉ.प्रा.दीपक पवार
नगर – मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेच्यावतीने 46 व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत निशांत दिवाळी अंकास उल्लेखनिय दिवाळी अंक म्हणून पुरस्कार नुकताच मुंबई येथील शानदान कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, तरुण भारतचे नागपुर आवृत्तीचे संपादक गजानन निमदेव, शुभा कामथे, जळगाव जिल्हा अर्बन बँकेचे संचालक नगरसेवक अमोल पाटील,ज्येष्ठ पत्रकार रिंगणकार सचिन परब आदि मान्यवरांच्या उपस्थितीत निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांनी स्विकारला. यावेळी नगरमधून सौ.शोभा दातीर, प्रा.वर्षा दातीर, दिलीप लावरे, डॉ.गंगाराम जोरी, स्वानंद पिंपुटकर, अमोल खैरे आदि उपस्थित होते.
यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार म्हणाले, मराठी भाषा ही 2300 वर्षेजुनी आहे याचा मला खूप आनंद वाटत नाही,परंतु मराठी भाषा 2,300 वर्षे कशी टिकेल याची मला खंत आहे. दिवाळी अंक हे आपल्याकरिता मोठे इंधन आहे. दिवाळी अंक मराठी माणसाला विचार करायला लावणारे आहेत. त्यातून होणार्या सृजनाच्या आधारे मराठी संस्कृती बहरत असते.त्यामुळे दिवाळी अंकांची परंपरा ही मराठी माणसासाठी महत्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रमुख कार्यवाहक प्रशांत घाडीगावकर, प्रशांत भाटकर यांनी सूत्रसंचालन केले; तर आभार अरुण खटावकर यांनी मानले.
निशांत दिवाळी अंकास नुकताच 6 जानेवारी 2022 रोजी प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाला असून, पूर्वीही महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण, नंदा फौंडेशन मुंबई, शब्दगंध साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, इंदिरा प्रतिष्ठान व अहमदनगर प्रेस क्लबचा बेस्ट रिपोर्टर असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी ‘सकाळ’च्या ‘अवतरण’ दिवाळी अंकाला ‘गणेश केळकर स्मृती सर्वोत्कृष्ट साहित्यिक दिवाळी अंक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे;तर ‘सकाळ’च्या दिवाळी अंकासह तरुण भारत (नागपूर), निशांत दिवाळी अंकास मनोरंजनकर का.र. मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट अंक, प्रसाद (पुणे), ऋतुरंग (मुंबई), समास (गोवा), चिकू पीक (पुणे), आनंद तरंग (पुणे), पुढारी दीपस्तंभ (कोल्हापूर), ऋतुपर्ण (पुणे), या दिवाळी अंकांनाही पुरस्कार देण्यात आला आहे.
———
कृपया प्रसिद्धीसाठी ऋतुजा प्रेस सर्व्हीस

फोटो – मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई शाखेचा राज्यस्तरीय उल्लेखनिय दिवाळी अंक पुरस्कार निशांत दिवाळी अंकाचे संपादक निशांत दातीर यांना मुंबई येथील शानदान कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी अभ्यास कक्षाचे प्रमुख प्रा.डॉ.दीपक पवार, शिवसेना आरोग्य कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शुभा कामथे, जळगाव जिल्हा अर्बन बँकेचे संचालक नगरसेवक अमोल पाटील,ज्येष्ठ पत्रकार रिंगणकार सचिन परब, तरुण भारतचे गजानन निमदेव आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here