लोणार/जगन पाटील
आज दिनांक 27/2/ 2022 रोजी वार रविवार लोणार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव उपकेंद्र तांबोळा अंतर्गत 423 बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले ,यामध्ये 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले,यामध्ये यापूर्वी डोस पाजण्यात आला असेल तरी पण,बाळ आजारी असेल तरी पण, बाळ नुकतेच जन्मले असेल तरी पण पोलिओ ला हद्दपार करण्यासाठी 27 फेब्रुवारी रोजी राबविली गेली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रेखा नागरे वैद्यकीय अधिकारी,डॉ.प्रशांत तेजनकर (वैद्यकीयअधिकारी)तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण काळे,आरोग्य सहायक जे डी वायाळ,आरोग्य सेविका टी टी शिंदे आणि आरोग्य सेवक रिझवान अहमद आणि सर्व आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यामध्ये सरस्वती सुजाता कडाळे,आशा कडाळे,किन्ही येथे गोदावरी लाकडे,संगीता मोरे पिपळखुटा येथे हर्षा घायाळ,वर्षा मापारी,मातमळ येथे वैष्णवी शिंदे,लता शिंदे तांबोळा येथे बेबी जाधव,अनिता आटोळे येथील सर्व आशा,अंगणवाडी सेविका व मदतनीस इ.आपला सहभाग नोंदवत पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.







