Home Breaking News हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ पीडित विवाहितेची पोलिसात तक्रार

हुंडा कमी दिला म्हणून विवाहितेचा छळ पीडित विवाहितेची पोलिसात तक्रार

0
330

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

पती सह सासरकडील मंडळी वर गुन्हे दाखलआपल्या राज्यात हुंडा घेणे हा कायद्याने जरी गुन्हा असला तरी अनेक ठिकाणी लग्नामध्ये हुंडा घेण्याची प्रथा दिसून येते आणि त्यातून काही घटना ही घडत आहे अशीच एक घटना लोणार मधून समोर आली आहे

लोणार मधील गजानन मापारी यांच्या मुलीचं पुणे येथील शिवाजी काळे यांच्या उमेश नामक मुलाशी लग्न 07 जानेवारी 2021 ला लोणार याठिकाणी झाले काही दिवस संसार चांगला चालला नंतर त्या आश्विनी नामक विवाहितेला पैश्याची मागणी करण्यात आली तुझ्या वडिलांकडून 10 लाख हुंडा घेऊन ये असा तगदा लावत त्याला मानसिक आणि शारीरिक छळ करणे सुरू झाले

हुंडा कमी मिळाला.. तुझ्या माहेरावरून आणखी पैसे आण, असे म्हणून पतीसह सासरच्यांनी लोणारच्या लेकीचा छळ सुरू केला आपल्या मुलीला त्रास दिल्या जातो यावरून विवाहितेचा वडिलांनी हात उसने करून 6 लाख 50 हजार रूपये त्यांना हुंडा म्हणून दिले हे रुपये यांनी ऑनलाइन दिल्याने त्यांच्या कडे नोंद आहे इतकंच काय तर लग्नात मुलीला 5 लाखाचे दागिने दिले होते त्याची देखील त्याच्याकडे पावती आहे मात्र इतके पैसे देऊनही काही दिवसांनी पुन्हा पैश्या साठी छळ सुरू झाला मात्र विवाहितेच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सासर च्या मंडळींनी त्या विवाहितेला मारहाण करून तिच्या अंगावरील सर्वच दागिने काढून घेत माहेरी सोडून दिले आणि जो पर्यंत पैसे आणणार नाही तो पर्यंत तुला घेऊन जाणार नाही अशी तंबी दिली त्यावरून विवाहितेने पोलिसात तक्रार दिली तक्रारीवरून लोणार पोलिसांनी सासरच्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मात्र पोलिसांनी अजूनही आरोपींना अटक केली नाही मात्र आरोपींना अटक करा आम्ही दिलेले पैसे परत करा अशी मागणी करत हे कुटुंब न्याय मागत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here