Home Breaking News गडचिरोली जिल्ह्यातील कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था...

गडचिरोली जिल्ह्यातील कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उपक्रमाची दखल.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी मराठी विभागाचा उपक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आभासी आँनलाईन कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
सदर कवी संमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील सतरा कवींनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवीला होता.
त्या निमित्ताने आज दिनांक ५ एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या येथे सहभागी कवींना संस्थेचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान डायट गडचिरोली येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,अधिव्याख्याता पुनित मातकर, विषय सहाय्यक डॉ विजय रामटेक, निलकंठ शिंदे,कुणाल कोवे, विठ्ठल होंन्डे, प्रदिप पाटील, समुपदेशक प्रभाकर साखरे व जिल्ह्यातील कवी उपस्थित होते.
प्रसंगी रवींद्र गजानन गेडाम,प्रतीक्षा पितांबर कोडापे,हर्षराज सहारे,मारोती आरेवार,सुजाता अवचाट,चांगदेव सोरते यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची आप-आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक निलकंठ शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ विजय रामटेके यांनी व्यक्त केले.