हिंगणघाट दि.७ एप्रिल
शहरातील कारंजा चौकस्थित चोथानी परिवाराचे वीआईपी सायकल या दुकानाची इमारत मध्यरात्री जमीनदोस्त करण्यात आल्याचे घटनेने शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे.
काल मध्यरात्री आपल्या सायकल दुकानावरती काही मंडळी बुलडोजर तथा जेसीबी चालवीत असल्याची माहिती मिळताच चोथानी हे पोलिस व प्रशासनाकड़े मदतीसाठी धावले,परंतु हे दिवाणी न्यायालयाचे प्रकरण आहे,असे सांगून त्यांना मदत नाकारण्यात आली.

चोथानी हे गेल्या ६०-७० वर्षापासून येथे भाड़ेकरू आहेत,त्यांचा सायकलचा मोठा व्यवसाय आहे,काल जेसीबीने केलेल्या अवैध कारवाईत त्यांच्या ४०० सायकली व इतर विक्रीचे लाखो रुपयांचे साहित्य उध्वस्त झाले.
अधिक माहिती घेतली असता,जयेश हरीभाई चंदाराणा रा. तहसील वार्ड व राजेश कोचर, नीरज चोरडिया, राकेश चंदाराणा, डॉ.प्रमोद सिंघवी यांनी गेल्या ४ जानेवारी २०२२ रोजी हेमलता मदनमोहन पुरोहित यांच्याकडून याच घराची खरेदी केली.
चंदाराणा व इतर हे शहरातील मोठे व्यावसायिक आहेत,वादातील मोक्क्याच्या जागा कमी किमतीत घेऊन त्यातून मोठा नफा मिळवायचा यात त्यांचा हथखंडा आहे.
या व्यावसायिकांनी लगेच दि. २१ मार्च २२ रोजी (जयेश चंदाराणा, राकेश चंदाराणा ,राजेश कोचर, नीरज चोरडिया डॉ.प्रमोद सिंघवी यांनी) एक अर्ज केला.

यामध्ये जागेच्या मालमत्तेबद्दल वर्णन करीत हिंगणघाट राम मंदिर वार्ड येथील आराजी ४२१.८० चौ.मी.प्लॉट व यावरील मकान नगरपालिका मालमत्ता क्र. ९१ सदर मकान जीर्ण झाले असून १०० ते १५० वर्ष जुनी इमारत आहे .
सदर इमारत नगरपालिकेने पाडावी,अशी विनंती केली . मुख्याधिकारी यांनी सदर अर्जाची अतीशीघ्रतेने दखल घेऊन २२ मार्च रोजीच जयेश चंदाराना व इतर यांना नोटीसद्वारे सदर जीर्ण बांधकाम पाडण्याचा आदेश दिला.
अतीतात्काळ चौकशी करून सदर इमारत फार जुनी असून शिकस्त झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर इमारतीच्या तळमजल्यावर पुढील बाजूस श्री हरीश शंभूलाल चौथानी यांचे व्हीआयपी सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे,श्री हरीश शंभूलाल चौथानी यांचे वापरामधील इमारतीचा भागात लाकडी फळीची लादली असून झुकलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आतील बाजूस लोखंडी बिमद्वारे आधार देण्यात आलेले आहे व उत्तरेकडील भिंत जीर्ण अवस्थेत आहे तसेच इमारतीच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रथम माळ्याचा कोपरा जीर्ण अवस्थेत आहे व तो भाग कधीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नोटीसीद्वारे सांगण्यात आले, सदर इमारत वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे त्या पासून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,करिता आपणावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटीस बजावण्यात येत असून सदर इमारत १५ दिवसाच्या आत पाडून टाकण्यात यावी.असेही सांगण्यात आले.
जयेश चंदाराणा व इतरांनी याच आदेशाचा आधार घेत ही कारवाई केली.

दि. 6 एप्रिल ला चंदाराणा व इतरांनी मुख्यधिकार्यांना अर्ज केला आपण दिलेल्या आदेशानुसार जयेश चंदाराना व इतर यांनी सांगितले की आम्ही कारवाई केली त्यामधील काही भाग जमीनधस्त करण्याचा राहिले हा भाग व्हीआयपी सायकल स्टोअर्स संचालक हरीश शंभूलाल चौथ्यानी यांच्या ताब्यात आहे व त्यांनी आपल्या आदेशाची अवहेलना केली . त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की आपण स्वतः चौकशी करून कारवाई करावी व येणारा खर्च आम्ही भरण्यास तयार आहो, व ही कारवाई अतिशीघ्र करावी ज्यामुळे जीवित आणि वित्त आणि होणार नाही ही जबाबदारी आमची नाही त्यामुळे कृपया ही कारवाई ताबडतोब करावी असे मुख्याधिकारी यांना निवेदनातून विनंती केली .
त्यानुसार लगेच त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान मोकाचौकशी केली.
यानंतर रात्री ११.३० च्या दरम्यान व्हीआयपी दुकानदारावर बेकायदेशीरपने कारवाई करून जमीनदोस्त केले .
*हिंगणघाट पोलीसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही*
*मुख्याधिकाऱ्यांनी अतिशीघ्र केलेली कारवाई संशयास्पद*
चोथानी यांचेकडे नगरपालिकेने दिलेले सर्टिफाइड कॉपी आहे.दि.३ जानेवारी रोजिचे हिंगणघाट नगरपालिकेने स्वतः प्रमाणपत्र दिले आहे.
त्यामध्ये इमारतीचे बांधकाम हे १९६० चे दर्शविले आहे. सध्या याला ६२वर्षे झाली आहेत.
मग जयेश चंदाराणा व इतरांनी दिलेल्या माहितीवर मुख्याधिकारी यांनी विश्वास कसा केला ?
डॉ. प्रमोद सिंघवी व जयेश चंदाराणा यांची मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची माहिती प्राप्त झाली!अशा अनेक कारणावरून मुख्याधिकारी जगताप यांनी दिलेल्या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे ७ मार्चला लेखी मध्ये तक्रार केली .
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा. खाजगी व्यक्तींकडून जोर जबरदस्तीने जेसीबी मशीन द्वारे दुकान जमीनधस्त केले दुकानातील ७० ते ८० लाख रूपयांच्या मालाचे नुकसान केले .तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचा अवमान करून पाडण्यात आल्याचा आक्षेप चोथानी यांनी घेतला आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा







