संग्रामपूर नगर पंचायत अंतर्गत शहरात गेल्या 8 महिन्या पासून मच्छर धुरळणी फवारणी केल्या गेली नाही. शहरात तापीच्या साथीने थैमान घातले आहे. धुरळणी फवारणी केली नसल्याने ताप या आजारा सोबतच डेंगू मेलेरिया सारख्या आजारांना नगर वासियांना बळी पडावे लागत आहे.

लाखो रुपयांचे कंत्राट या बाबत दिले असतांना सुध्दा नगर पंचायत कडून 8 महिन्या पासून धुरळणी फवारणी केली नाही.त्यामुळेच मच्छर पैदास मोरे मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.निवेदन देती वेळी याबाबत नगर पंचायत अधिकारी सोबत चर्चा केली असतांना त्यांनी सुध्दा ही बाब मान्य केली. घन कचरा ठेकेदार यांने कामे न करता बिल काढली त्या बाबत त्यांच्या वर कार्यवाही करावी ही मागणी नगर वासियांनी केली.
संग्रामपूर नगर पंचायत ने तात्काळ धुरळणी फवारणी केली नाही तर कोणत्याही क्षणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर वासियांनी दिला आहे.








