यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या

0
844

 

यावल तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील . याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुमनबाई विलास भालेराव (४५) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

घरात कोणी नसताना आत्महत्या सुमनबाई विलास भालेराव (४५, डांभुर्णी ता.यावल) या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार, १७ एप्रिल रोजी सुमनबाई भालेराव यांनी घरात कोणी नसताना दुपारी पंख्याच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान नातेवाईक हे घरी आल्यानंतर त्यांना सुमनाबाई यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खाजगी वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार अजिज शेख करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here