हिंगणघाट :- उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन नॅशनल हाईवे नागपुर ते हैदराबाद रोड वर मोठ्या प्रमाणात गौ वंश तस्करी होत असून हिंगणघाट शहर याचे केंद्रबिंदू बनले आहे. इतर राज्यातून व आपल्या महाराष्ट्र मधील अनेक जिल्हा मधून गौ तस्कर या मार्गावरून दररोज शेकडो जीवत गौ वंश यांना हैदराबाद इथे गौ माँस विक्री करीता घेऊन जातात या मार्गवर दुर्दैवी रित्या ट्रक व इतर गाड्या च्या माध्यमातून यांना घेऊन जात असतांना जे गौ वंश मृत होतात त्यांना हे कवडघाट इथे असलेले पूला वरून खाली फेकून देतात ज्या मुळे हे गौ वंश अनेकदिवस इथे सडून ,गळून अस्त व्यस्त अवस्थेत याठिकाणी असतात दुर्गन्ध व गंभीर रोग पसरवत राहतात. तसेच या या रोडवर कंपनी असल्यामुळे या रोडवर लोकांची गर्दी असते याचा लोकांना त्रास होत आहे.
अनेक धर्मात गौ वंश यांना पूज्यनीय मानत असून अनेकांची या गौ तस्करी मुळे अनेक गौ वंश चे क्षतविक्षत शव रस्त्याच्या बाजूला पडून राहतात ज्या मुळे हिंगणघाट शहरातील व ग्रामीण भागातील जनतेच्या मनात चीड निर्माण होत आहे , धार्मिक तेढ देखील निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी आपल्यास विनंती आहे की आपने समुद्रपुर तहसील मधील जाम पासून तर वडनेर पर्यन्त हाईवे वर पोलीस चौकी करावी ज्या मुळे हे गौ वंश तस्करी पूर्ण पने बंद होईल व् या गौ वंश तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करावी . यावेळी हिंगणघाट बचाव समितीचे अध्यक्ष सुनील डोंगरे,, दिनेश वर्मा, राकेश झाडे, अमित देवढे उपस्थित होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा







