हिंगणघाट वडनेर – येरणगाव येथे मोठ्या भावाने लहान भावाच्या घरातील साहित्याची तोडफोड करुन केले मोठ्या प्रमाणात नुकसान

0
284

 

नईम मलक

हिंगणघाट तालुक्यातील येरणगाव येथे भावाच्या घरी कोणी नसताना आज सोमवारी मोठा भाऊ त्याची पत्नी व जावयासह अन्य एका इसमाने लहान घरातील साहित्याची तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार येरणगाव मोठ्या भावाने ३ दिवसा आधीच त्यांच्या लहान भावाच्या कपाशीच्या शेतातील शिविगाळ कर त्यांच्या पत्नीस सब्बल मारहाण केली या संबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. लहान भाऊ पुरुषोन्नाम नगराळे हे व त्याची पत्नी बाहेर गेली होती.यावेळी यत्यांची मुलगी होती. मोठा भाऊ त्याची पत्नी त्यांचा जावई व अन्य १ व्यक्तीने कमांडो आहे असे म्हणत घरात प्रवेश करुन तोडफोड करुन मुलीला शिवीगाळ करत मारण्यास प्रयत्न केला यावेळी घरात असलेले गहु, कपडे कपाट इलेक्ट्रीकल वस्तू फेरकून दिल्या पावसामुळे खुप मोठे नुकसान झाले.त्यांची मुलगी पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर घरी कुणी नव्हते. आई आणी भाऊजा यवतमाळ वरुन आले घरी पोहचले तेव्हा घरी सगळे सामान अस्ताव्यस्त करून दिसले ते यांचे कपाटातले २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने सुध्दा दिसत नव्हते या संबंधी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.,,नईम मलक हिंगणघाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here