हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश…

0
230

 

सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अनेक कार्यकर्त्या सह पक्ष प्रवेश..
हिंगणघाट प्रतिनिधि मलक मो नईम
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अतुल भाऊ वांदीले यांच्या हस्ते झाला पक्ष प्रवेश …

 

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुल वांदिले यांच्या उपस्थित व प्रवीण श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली सुलतानपूर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांच्या शेकडो कार्यकर्तेसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश.
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये मागील तीन महिन्यापासून मोठी इन्कमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असून अनेक मतदार संघातील दिगग्ज नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत हा प्रवेश घेण्यात आला.रा.का.चे प्रवीण श्रीवास्तव व रविकिरन कुटे यांच्या पुढाकाराने सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर यांनी दुपट्टा घालून रा.कॉ.पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते आज हा पक्ष प्रवेश झाला.

सुलतानपुर येथील माजी सरपंच रमेश भोयर, विजय बुटले, गणेश सातपुते, विजय पवार, सुनिल येरेकर, नारायन सावळे ज्ञानेश्वर भोयर, अवकास भगत, अजय आटोळे, प्रनय घुगरुड, कुनाल नागठाणे, प्रज्वल भगत, भागवत भोयर, प्राजंल कुबडे, गोपाल निशाणे, गोविंद निखट आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश केला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल बोरकर, सुनील भुते,बच्चू कलोडे, राजू मुडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here