शेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जयंतराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे सरकारचा निषेध

0
331

 

 

शेगाव  इस्माईल शेख

शेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याकडून हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष बाबत अपशब्द वापरले यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी या वक्ता याबाबत दिलगिरी व्यक्त केली. परंतु हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं.परंतू थोर महापुरुषांच्या या सरकारकडून वारंवार अपमान होत आहे.

तरीसुद्धा प्रस्थापित शासन याच्यावर दुर्लक्ष करून सर्व निवेदन तसेच आंदोलनाची बाजू भिजती ठेवत आहे. या शासनाचे निर्ज्यपणा मुळे सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संसदीय मर्यादा व परंपरा पाळणारा पक्ष आहे.

पण तरीही सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू दिले जात नाही.त्यांचा आवाज दडपला जातो.विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सातत्याने विनंती करीत असतानादेखील विधानसभा अध्यक्षांनी ऐकले नाही.

अश्या सामाजिक,राजकीय महाराष्ट्राची आधुनिकतेची समृद्धीची बाजू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सतत संसदेत, असो वा सामाजिक पातळीवर असो, न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न पक्ष सदैव करीत असतो. परंतु वारंवार शासनाच्या हुकूमशाहीमुळे पक्षांच्या नेत्यांवर टीका करून महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत आहे.

असा आरोप शिंदे सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. सरकारचा निषेध म्हणून आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी
शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर… जयंत पाटीलसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…अशा घोषणा देत .

जयंतराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे सरकारचा निषेध करत या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय अशा शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.

 

शहराध्यक्ष दिनेश साळुंखे शैलेश पटोकार, गणेश पिसे, संतोष शेगोकार,रवींद्र भिरडे, राजू काठोळे, राहुल वाघमारे,सरफराज खान, अन्साद खान, अहमद खान, कृष्णा देशमुख, बाळू टावरे, पवन नामदास, शौकाब खान, इमाम भाई,गजानन हुसे, सागर डांबरे इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here