कोल्हापूर नंदवाळ येथे विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा यांचे पाषाणमूर्ती

0
389

_______________________________________
कोल्हापूर करवीर तालुका नंदवाळ येथे संजय बळवंत निकम राहणार नांदगाव यांच्या घरी गेली तेरा वर्षे विठ्ठल रुक्मिणी व सत्यभामा यांचे पूजन.

प्रत्येक वर्षी वर्धापन दिना दिवशी पहाटे अभिषेक काकड आरती पूजा त्याचबरोबर दुपारी सत्यनारायण पूजा त्यानंतर संध्याकाळी पूजा व पूजा पाठ ह्या मुर्तींचे दर्शनास नंदवाळ येथील भाविक दर्शनाचा लाभसह कोल्हापुरातील पंचक्रोशी वारकरी व भजनी कलाकार व इतर भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेतात.

संजय निकम हे आपल्या घरी मूर्ती बसवल्यापासून तिथीप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रसाद म्हणून सर्व गावांबरोबर कोल्हापुरातील पंचक्रोशी भाविक वारकरी, भजन कलाकार,कीर्तनकार व गावकरी असे अनेकांना भोजनाचा लाभ दिला जातो.

संजय निकम हे बांधकाम कामगार आहेत. व सौ.रेखा संजय निकम हे गृहिणी असून दोन मुले शिक्षण घेतात.संजय निकम वर्धापन दिन स्वतःच्या स्वखर्चात करतात.
घरी कुटुंबात संजय बळवंत निकम सौ.रेखा संजय निकम कु.ऋषिकेश संजय निकम कु.ओमकार संजय निकम कुटुंब परिवार आहे.

सूर्या मराठी न्यूज
तानाजी कुऱ्हाडे
कोल्हापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here