इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगांव . हात गाडीवर नाष्ट्यासाठी आलेल्या गिर्हाईकास पैसे देण्याचे कारणावरून लोखंडी झार्याने मारहाण करुन जखमी केल्याची घटना दि. १ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.१५ वाजता दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली.
हकीकत अशा प्रकारे आहे की स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सोहम गजाननराव डोळसे वय 29 वर्ष रा तुळजाईनगरी कारंजा रोड कामरगांव ता कारजा लाड जि वाशिम हे व त्यांचे मित्र नाष्टा करण्या करीता हातगाडीवर गेले असता नाष्टाचे पैसे देण्याच्या कारणावरुन यातील आरोपीने फिस व त्यांचे मित्र यांना शिवीगाळ केली.
आरोपी क्रं दोन नाव माहीती नाही याने फिस लोंखंडी झारा ने डोक्यात मारुन जख्मी केले चापटाबुक्यांनी मारले तसेच जिवाने मारण्याची धमकी दिली.
crimenews:याप्रकरणी सोहम गजाननराव डोळस यांनी शहर पो.स्टे.ला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन शहर पोलिसांनी आरोपी -उमेश शेगोकार व त्यांचे सहकार्याने विरूध्द अप नं. ०१ /२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भा.द.वि.अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहापोनी गजानन गांवडे हे करीत आहेत.