journalist| पत्रकारांनी गोरगरीब शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा- हाजी मुजमील खान..मौलाना आझाद विचार मंच तर्फे पत्रकारांचा सत्कार.

0
3

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हटले जाते पत्रकार हा समाजाचा आईना असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना आपल्या लेखणी द्वारे सर्व समाजासमोर आणत असतो.

बदलत्या जमान्यात डिजिटल युगामध्ये पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे या जबाबदारीचे भाण ठेवून पत्रकारांनी गोरगरीब शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

असे प्रतिपादन. मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हाध्यक्ष हाजी मुजमील खान यांनी शेगाव येथे केले पत्रकार दिनानिमित्त स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम भवन येथे मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने कर्तुत्वान पत्रकारांचा छोटेखानी कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 

 

journalist: यावेळी मार्गदर्शन करताना हाजी मुजम्मिल खान हे बोलत होते या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास सूर्या मराठी न्यूज चॅनलचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख पत्रकार समीर शेख यांचा हाजी मुजम्मिल खान यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला अतिशय छोटेखानी झालेल्या या सत्कार सोहळ्याला मजहर खान, चांद ठेकेदार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here