बिग बी अमिताभ बच्चन यांची ॲंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार ८१ वर्षीय अमिताभजींना खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान मुंबईतील नामांकित कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अमिताभ बच्चन व त्यांच्या आप्तेष्टांकडून याबाबत अजून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही.
अलीकडे अमिताभ बच्चन यांची तब्येत फारशी ठीक नसल्याने ते सतत चर्चेत असतात. हल्लीच त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे आज त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले गेले.amitabh bachchan
यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरवरून एक ट्विट सुद्धा केले आहे. “आपणां सर्वांचे मन:पूर्वक आभार” असे त्यांनी या ट्विट मध्ये लिहिले आहे.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
अमिताभजींचे ट्विट वाचून सर्वांना बरं वाटत आहे. थोडक्यात म्हणजे, अमिताभ बच्चन यांना ऑपरेशन नंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वाटत असेल, म्हणूनच त्यांनी ट्विट च्या माध्यमातून सांगितले.amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट तर सुपर डुपर असतात, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. मात्र कित्येकदा ते चित्रपटांच्या सेटवर जखमी झालेले आहेत.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
amitabh bachchan:सर्वात पहिल्यांदा “कुली” या चित्रपटाच्या सेटवर त्यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना खांदेदुखीचा त्रास असल्याचे म्हटले जाते. अमिताभजींच्या कुटुंबियांपासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी लागलेली असते.