सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

crimenews :सिंदी(रेल्वे)-ज्वलनशील पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या खडकी येथील युवकाला स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री बस स्थानकावर इन्व्होवा कार आणि मुद्देमालासह अटक केली.

पोलीसांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सह.पो.नि.वंदना सोनुने व सहकारी गस्त घालत असतांनाच एक कार बस स्थानक परिसरात संशयास्पद स्थितीत दिसली.त्या वाहनांची तपासणी केली.

असता ते वाहन खडकी(आमगाव)येथील इमरान लियाकत अली सैय्यद वय(३२) यांच्या मालकीचे असून त्या वाहनात सहा डब्यांमध्ये १२० लिटर पेट्रोल मिळून आले.

या प्रकरणी सह.पो.नि.वंदना सोनुने,जमादार संजय भगत,उपनिरिक्षक शामसुंदर सूर्यवंशी व सहकाऱ्यांनी आरोपी ला कार आणि अवैध पेट्रोल सह अटक केली.

वाळू माफियांना रंगेहाथ पकडण्यासाठी तलाठी उतरले रस्त्यावर (Revenuenews )

 

crimenews:आरोपीविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३आणि ७ अन्वये गुन्हा नोंदवला व. पुढील तपास सुरु असून शहरात अवैध पेट्रोल विकणाऱ्यांत धडकी बसली आहे.

Leave a Comment