विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू गावकऱ्यांनी केला अंत्यविधी डोंगर कठोरा येथील घटना ( brekingnews )

0
1

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

brekingnews:नुकतेच पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे विजे बाबत दक्षता घेण्याचे आवाहन महावितरण करून वेळोवेळी करण्यात येते परंतुशॉक लागण्याच्या घटना फक्त मानवा सोबतच घडत नसून प्राण्यांंसोबत देखील घडतात यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका वानरास विजेचा शॉक लागून ते मरण पावले ही घटना दिनांक 27 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

शॉक लागलेल्या वानरास त्यांच्यातीलच एक वानर त्याला उठवू लागले व त्याच्याजवळ गिरट्या मारू लागले हे दृश्य पाहून गावातील नागरिक भारावून आले.

त्यातील काही नागरिकांनी वानराचा अंत्यविधी करण्याचे ठरविले गावातील कळसकर व झोपे कुटुंबांनी यासाठी पुढाकार घेतला पुष्पा कळसकर व संगीता झोपे या दोघेही महिलांनी त्या वानरास आंघोळ घालून एखाद्या सव्वाशिणी प्रमाणे साडी चोळी व बोळवन आणून तिरडी सजवण्यात आली या अंत्यविधीसाठी गावातील वारकरी संप्रदायांमधील टाळकरी देखील उपस्थित होते

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व हरिनामाच्या गजरात या वानराची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली या वानराला गावातीलच असलेल्या खंडोबा देवस्थान मधील जागेवर पुरण्यात आले .

आश्चर्याची बाब म्हणजे या वानराचे तिसरे व गंध मुक्तीचा कार्यक्रम देखील गावात होणार आहे या सर्व कार्यक्रमासाठी हर्षल कळसकर सागर झोपे हे प्रयत्न करीत आहेत तसेच डोंगर कठोरा गावातून सर्व स्तरातून आर्थिक व अन्न धान्याची मदत देखील करण्यात येत आहे .

brekingnews:एका प्राण्याबद्दल आपुलकीची भावना ठेवून जो कार्यक्रम डोंगर कठोरावासी यांनी केला आहे तो कौतुकास्पद असून डोंगर कठोरा वासियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच प्राणीमात्रांवर दया करा हा संदेश देखील डोंगर कठोरा वाशी या घटनेतून तालुका वासियांना देत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here