प्रतिनिधी सय्यद जहीर
bus:एसटीच्या प्रवासात प्रवाशांना काही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी ती तक्रार अथवा समस्या थेट आगारप्रमुखांना फोन करून निवारण करून घ्या, असे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
त्यामुळे प्रवाशांच्या अडचणीचे निराकरण करणे सोपे होणार आहे. त्यासाठी आगारप्रमुखांसह इतर महत्वाचे दूरध्वनी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)
एसटी प्रवासात चालक अतिवेगाने गाडी चालवत आहे, चालक गाडी चालवताना मोबाईलवर बोलत आहे, वाहक उध्दट वर्तन करत आहे, योग्य त्या ठिकाणी उतरवले जात नाही, अशा अनेक समस्यांचा यामुळे तोडगा निघणार आहे. यापूर्वी अशी यंत्रणा नव्हती.
मात्र, महामंडळाने आता संबंधित आगार व स्थानकाचा क्रमांक प्रसिध्द करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्या व तक्रारीचे तातडीने निराकरण होणार आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
bus:एसटी महामंडळाच्या नव्या निर्णयानुसार आता बसमधील चालक सीटच्या पाठीमागील जागेवर जिथं काही सूचना लिहिलेल्या असतात, आता तिथं संबंधित बसच्या आगारप्रमुखांचा मोबाइल नंबर देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना प्रवासात काही अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांशी संवाद साधता येणार आहे.




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



