मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
आमदार संजय कुटे यांनी वकील संघासोबत घेतला आढावा
जळगाव जामोद : न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत मा. मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जामोद येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लवकरच जळगाव जामोदमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यरत होणार असून, परिसरातील नागरिकांसाठी न्यायप्रक्रिया अधिक जलद व सुलभ होणार आहे.drsanjaykute
या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर जळगाव जामोद येथील वकील संघाच्या कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत आमदार डॉ.संजय कुटे यांनी वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांशी व सदस्यांशी सविस्तर संवाद साधत न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या पुढील प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेतला.court news
न्यायालयाच्या इमारतीची उपलब्धता, आवश्यक पायाभूत सुविधा, कर्मचारी नियुक्ती तसेच न्यायालयाचे कामकाज सुरळीत सुरू होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार संजय कुटे यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर जळगाव जामोद तसेच परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत वारंवार जावे लागणार नाही. वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार असून न्यायदानाची प्रक्रिया अधिक प्रभावी आणि गतिमान होईल. Jalgaonjamod
या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक, वकील आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बैठकीस वकील संघाचे अध्यक्ष ॲड. रुपेश विश्वेकर, सचिव ॲड. अभिमन्यू वाघ, ज्येष्ठ सदस्य ॲड.मनोहर माहेश्वरी, ॲड. करीम खान, ॲड.शशिकांत गुप्ता, ॲड.बाळासाहेब खिरोडकर, ॲड. विजय वानखेडे, ॲड. राहुल इंगळे, ॲड. दत्ता खेर्डेकर, ॲड. मनसुटे, ॲड. धर्म, ॲड.अमर पाचपोर, ॲड. तोगळकर, ॲड. रतन इंगळे, ॲड. दीपक इंगळे, ॲड. गजेंद्र सातव, ॲड. रवी उमरकर यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
न्यायालय स्थापनेच्या मंजुरीमुळे जळगाव जामोदच्या न्यायव्यवस्थेच्या विकासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला असून, नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी न्यायसेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.



