Home बुलढाणा Sangitraobhongal/आठ वर्ग, तीनच वर्गखोल्या; काकणवाडा बु येथील शाळेवरील अन्याय दूर करा –...

Sangitraobhongal/आठ वर्ग, तीनच वर्गखोल्या; काकणवाडा बु येथील शाळेवरील अन्याय दूर करा – संगीतराव भोंगळ

0
2

 

संग्रामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी जिल्हा परिषद बुलढाणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांच्याकडे भेट घेऊन केली.sangitraobhongal

काकणवाडा बु. येथील ग्रामस्थांनी शाळेच्या विविध समस्यांबाबत संगीतराव भोंगळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्याची तात्काळ दखल घेत भोंगळ यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद गाठून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.

काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत सध्या १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या आठ वर्गांसाठी केवळ तीनच वर्गखोल्या उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागत आहे. जागेअभावी काही वर्गांना व्हरांड्यात बसून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.oanchaysamiti

अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अध्यापनात अडथळे निर्माण होत असून शिक्षणाचा दर्जाही खालावत आहे. शिक्षकांनाही अध्यापन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, काकणवाडा येथील उर्दू भाषिक शाळेची स्थापना संगीतराव भोंगळ हे जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती असताना त्यांच्या पुढाकारातून झाली होती. त्यामुळे या शाळेच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांची तात्काळ दखल घेत पुन्हा एकदा प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा सुरू केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून काकणवाडा बु. येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेस तातडीने दोन नवीन वर्गखोल्या मंजूर करून शाळेवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संगीतराव भोंगळ (राजू पाटील) यांनी केली.

Sangitraobhongal यावेळी गावातील प्रमुख नागरिक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनाची प्रत शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांनाही सादर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here