प्रतिनिधि सैय्यद जहीर
पत्रकारीतेच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे हा निर्णय मनाशी बांधून पत्रकारीतेचं व्रत हाती घेतलं. दैनिक नवभारत, नवराष्ट्र, दैनिक मतदार, दैनिक महासागर,मातृभूमी, चिखली दर्पण, अशा वर्तमान पत्रात काम केले आहे पत्रकारितेला सुरुवात केली असून आज रोजी मातृभूमी व मतदार तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. त्यांना पत्रकारितेचा गेल्या 22 वर्षाचा अनुभव आहे.
राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापार, कृषी, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर मंडळीशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध जोपासात
आपल्या कामाचा ठसा उमटविला.
या अगोदर लोणार तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले, तसेच लोणार नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून, सध्या लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे, तसेच परवाची संघटनेच्या माध्यमातून,या अनेक संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना व समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम पत्रकार म्हणून त्यांनी समाजातील सर्वच स्तरातरला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याचप्रमाणे विद्यार्थी व शेतकरी यांच्या प्रश्नाला नेहमीच महत्वाचे स्थान दिले आहे. विविध चळवळीतील लोकांच्या
लढ्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम करतात.
याच कार्याची दखल घेऊन जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी मेहकर लोणार विभागीय संघटक पदी शेख समद शेख अहमद, यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देतांना सांगितले की, जिल्हा पत्रकार संघाने जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे,
Lonarnews :त्याबद्दल मी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी व त्यांच्या संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी च्या वरिष्ठांनी जो विश्वास माझ्यावर टाकला त्याचे मी पुर्णपणे विश्वास सार्थक करुन संघटनेचे विभागीय विस्तारासाठी जोमाने कामाला सुरुवात कराणार असल्याचे प्रतिपादन शेख समद यांनी व्यक्त केले.